तराईतल्या शांत उपवनी खजिना अक्षररूप
कुणी लपविला कोणासाठी खोदुन खोदुन कूप
बर्फ जाहल्या सरोवरांवर धुके दाटले गूढ
काठावरती झाड जाळते चंदनगंधीत धूप
शिशिरामध्ये उपवन अवघे मौनी आत्मस्वरूप
व्रतस्थ पक्षी मूकपणाने आळवितो ग भूप
पानगळीने वृक्षतळीची माती पर्णांकीत
वसंत वाऱ्याची चाहुल मन करते काव्यांकीत