भर बाराची वेळ तरीही
कोकिळ ताना घेय तरीही
कुठे कावळा क्रो क्रो करतो
जुनाट वाहन वेग तरीही
चिकचिक दलदल अवती भवती
खातो कोणी भेळ तरीही
शिट्टी वाजे कुठे कुकरची
शिजे चुलीवर पेज तरीही
कार कुणाची पुढे न जाते
उघडे आहे गेट तरीही
पदर उडे हा वाऱ्यावरती
कुणी पकडते शेव तरीही
माप सुनेत्रा तुझेच असली
शेवटचा हा शेर तरीही
मात्रावृत्त – ८+८=१६मात्रा