बाभूळ छाया लांबली
काट्यांसवे शेफारली
मउ तीळपोळी सानशी
साऱ्यांमधे मी वाटली
सैलावली अभ्रे नभी
पाठीवरी मी टाचली
गालावरी पडता खळी
तो न पण ती लाजली
माझी न त्याची ती परी
त्याचीच वाटे सावली
गौरीपरी हिमगौर ती
आहे छबेली बाहुली
माझी सुनेत्रा वासरी
टोचून काटे फाडली
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/