तुझ्याचसाठी अजून मारुत झऱ्याप्रमाणे वहात आहे
सळसळणाऱ्या रवात त्याच्या सजल घनांचा निवास आहे
उधळित सुमने सुगंध झुलती कलरव पक्षी वनात करिती
भरून वाहे तुडुंब दुहिता निळी नव्हाळी जलात आहे
पहाट वारा झुळझुळणारा उडवित जाई बटा लतेच्या
खट्याळ त्याच्या अदांवरी या गझल गुलाबी फिदाच आहे
सुकून गेली कधी करपली मृदूल माझी जरी फुलेही
सतेज पर्णी हटेल ठिणगी चमचमणाऱ्या दवात आहे
वसंत रंगा बरसत येतो धरा उन्हाने फुलून जाते
नवीन अंकुर मनात इवला तयातुनी मी पहात आहे
अक्षर गण वृत्त – मात्रा ३२
लगावली – लगाल गागा/लगाल गागा/लगाल गागा/लगाल गागा/