तुळस मोगरा – TULHAS MOGARAA


ठेवू कोठे तुळस मोगरा
गच्च दाटला हरित कोपरा

काव्य बहरले पान-फुलांनी
सैल जाहला देह चेहरा

बैल उधळतिल हातामध्ये
धरून ठेव तू घट्ट कासरा

शेवटचे दिस गोड व्हावया
हळू हळू थांबतो भोवरा

मधुर फळांची बाग शिंपण्या
आडामध्ये जाय पोहरा

सुखी जाहली माझी बाळे
ऐकव गझला अता शायरा

चढून जाऊ डौलामध्ये
वळणदार हा मस्त दादरा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.