वेताळ वाडी पाताळ माडी
वेताळ वाडी आभाळ माडी
सोन्यात भारी लेण्यास बांधू
वेताळ वाडीचा काळ माडी
बोलून होता मौनात सांडे
वेताळ वाडी वाचाळ माडी
तोंडास काळे फासून नाचे
वेताळ वाडी नाठाळ माडी
वेल्हाळ गोष्टी खोट्याच सांगे
वेताळ वाडी पाल्हाळ माडी
येण्यास सोटे बाहेर सारे
वेताळ वाडीला जाळ माडी
राखेतुनी घे आता भरारी
वेताळ वाडीचा माळ माडी
रंगून ब्राम्ही झोकात नाचे
वेताळ वाडी सांभाळ माडी
ये सुंदरी तू अंकात मांडू
वेताळ वाडीचा ताळ माडी
काढावयाला येणार दर्दी
वेताळ वाडीचा गाळ माडी
वाहून जाता वस्त्या भुतांच्या
वेताळ वाडीला चाळ माडी
खोदून खाणी चाळून माती
वेताळ वाडीला पाळ माडी
हातात घे तू गाणे सुचाया
वेताळ वाडीचा टाळ माडी
कापून काढे गुंता नकोसा
वेताळ वाडी गाठाळ माडी
पाजेल ताडी ताजीच साकी
वेताळ वाडी सायाळ माडी
ओसाड भूमीला नांगराया
वेताळ वाडीचा फाळ माडी
चाटून खाई रक्ताळ मधा
वेताळ वाडी चाटाळ माडी
गंड्यास बांधे अंगात येते
वेताळ वाडी बाधाळ माडी
चौकात थांबे मारीत डोळे
वेताळ वाडी चांडाळ माडी
डोकेच मोठे आहे सुनेत्रा
वेताळ वाडीला माळ माडी
अक्षर गण वृत्त – मात्रा १८
लगावली- गागालगागा/गागालगागा/