आधी वावटळ येते धूळ फर्रारा उडाया
दिशा दाही नाचतात पीळ भर्रारा सुटाया
पीळ सांग सोडवाया चक्रीवादळी पिसाटा
ओत पोते भरुन मीठ भूत गर्रारा फिराया
धाव धाव धावताती कृष्ण मेघ सैरावैरा
कडाडते वीज बाई खरा दर्रारा कळाया
अंगांगात भुईच्या ग काटे कुसळांची गर्दी
मातीवर लोळ लोळे वात खर्रारा कराया
शुभ्र टपोर गारांचा मारा ढगातून होई
गात नाचू अंगणात चिंब सर्रारा भिजाया
गझल मात्रावृत्त – मात्रा २७(१३/१४)