टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा
देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा
गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा
पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा
तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला
आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा
जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा
जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा
लेन्स असूदे अथवा चष्मा नीट पारखुन बघ संख्या
अनंत असुदे किंवा शंभर धर्म दिगंबर जैनांचा
मात्रावृत्त( ८+८+८+६=३०मात्रा)