सजुन धीर यात्री मला भेटण्या ये
भरुन नीर गात्री मला भेटण्या ये
निळ्या लुप्त सीमा तिथे दृश्य मीरा
करुन मीरा खात्री मला भेटण्या ये
घनी दुग्धधारा धवल चांदण्यांच्या
भरुन क्षीर पात्री मला भेटण्या ये
पहाटे दवाने पुरी चिंब भिजते
म्हणुन खीर रात्री मला भेटण्या ये
जिथे गाठ गुंता तिथे मज बुलावा
बनुन तीर कात्री मला भेटण्या ये
कडक घोलव्यांची चुलीवर तुझ्या तू
करुन खीर धात्री मला भेटण्या ये
विमानात जागा जरी ना मिळाली
बसुन वीर दात्री मला भेटण्या ये
अक्षर गण वृत्त – मात्रा २०,
लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/
त्रि काफिया गझल