गळे उदासी नको नकोशी
फुलून आली खरी असोशी
जळात लाटा नभास भिडती
विराट ओशन उडेल जोशी
हटेल कचरा नकोनकोसा
बनून हिरवी खुलेल मोशी
हृदय नव्याने भरेल पुन्हा
कळ्या फुलांसम फळास सोशी
घडेल आता फुला हवे ते
पुन्हा किडा तो रमेल कोशी
अक्षर गण वृत्त – मात्रा- १६
लगावली-लगालगागा/लगालगागा/