मुक्त प्रकृती खुली संस्कृती
ऊन मृदुल सावली संस्कृती
निसर्ग सृष्टी अमूल्य वनचर
हीच खरी आपुली संस्कृती
प्रकृतीस मम ठेच पोचता
मीच बुडविली जली संस्कृती
धुवांधार पावसात भिजुनी
पुन्हा पुन्हा सुकविली संस्कृती
नय दृष्टीने वेध घेउनी
सुनेत्रात टिकविली संस्कृती
गझल मात्रावृत्त – मात्रा १६