जपण्यास मी काही फुले बहरात त्यांच्या नाचले
ओलावण्या दाही दिशा मखरात त्यांच्या नाचले
वाचाळता होती खरी जाणून तेव्हा थांबले
मौनातल्या ओठांवरी अधरात त्यांच्या नाचले
रानातल्या मातीत मी पेरून काही पाहिले
होते जरी खेडे भले शहरात त्यांच्या नाचले
माझेच होते काव्य ते पण का अशी भांबावले
मुखपृष्ठ होते कैक पदरी कव्हरात त्यांच्या नाचले
अवघड जरी वेळा दिल्या त्या पाळणे जमवून मी
प्रहर होते शून्य सारे प्रहरात त्यांच्या नाचले
अक्षरगण वृत्त – मात्रा २८
लगावली- गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा/