नाताळ
घेऊनी आलाय भेटी कोण सांगा
घेऊनी भेटींस गोष्टी दोन सांगा
गोडवा नात्यात आणे काव्य माझे
गातसे नाताळ गाणे रम्य माझे
…
तराई
मम् रुबाईत मीच लिहिले “बोल” गझले
मम तराईत मीच दडले बोल गझले
भावलिंगी मुनी दिगंबर आत्मधर्मी
मम शिलाईत मीच विणले “बोल” गझले
…
सगाई
अखरम वा अखरब असुदे तव वृत्त रुबाई
मतला अन शेराची व्हावी खरी सगाई
चारोळीतुन एकसंध आशय प्रकटोनी
मुक्तक सहजी होण्यासाठी घाल शिलाई