भरात आली गझल गुणाची
सुखात भिजली विमल गुणाची
दवात भिजवी फुलांस साऱ्या
अशीच ती रे सजल गुणाची
तुला न कळली तिला न कळली
कमाल तिचिया अचल गुणाची
मृणाल बनते मुलांस जपण्या
खरीच सुंदर कमल गुणाची
कितीक आले जरी मळविण्या
कधीन मळते अमल गुणाची
विरून जाई खिरून जाई
मृदुल मनाची तरल गुणाची
जशी निळाई तशी सुनेत्रा
गझल निळी तव धवल गुणाची
वृत्त – जलौघवेगा, मात्रा १६
लगावली – ल गा ल गा गा/ ल गा ल गा गा
One response to “निळाई – NILAAEE”
वाह खुपच छान…धवल गुणांची- निळी गझल