टाक झाडुनी वाकुन वाकुन पाला पाचोळा
स्वच्छ कोपरा बघून त्याला कर लवकर गोळा
ढीग पडे हा झोपाळ्यावर धुतल्या वस्त्रांचा
नकोस घालू घड्या बिड्या तू कर चोळामोळा
नीतळ चष्मा घाल धुळीतिल करताना कामे
उडता कचरा डोळ्यामध्ये धू लवकर डोळा
दगडासम बघ तनमन झाले जागी हो आता
झोके देण्या मनास सखये बांधच हिंदोळा
गाई गुरांना खाण्यासाठी बनव पुरणपोळी
बैलांसाठी आनंदाचा सण असतो पोळा
मात्रावृत्त – ८+८+१०=२८मात्रा