उत्तम दशगुण धर्म जाणती मुनी दिगंबर
उत्तमतेचे मर्म जाणती मुनी दिगंबर
चौविस तीर्थंकर जैनांचे जैन मंदिरी
उत्तम अवघड कर्म जाणती मुनी दिगंबर
द्रव्यलिंग अन भावलिंग युत पंचपरमपद
उत्तम त्यांचे घर्म जाणती मुनी दिगंबर
काळे गोरे भुरे गव्हाळी अनंत निवडक
उत्तम अस्सल चर्म जाणती मुनी दिगंबर
अंगांगावर ठेवायाला बोट कसेही
उत्तम कुठले वर्म जाणती मुनी दिगंबर
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)