पत्र पीयूष – PATRA PEEYUSH


जपुन ठेवले अजुन अंतरी तुझ्या स्मृतींचे पत्र पीयूष
जरी जाळले जरी फाडले पुरून उरले पत्र पीयूष

अता न चिंता कशाकशाची पार जाहली सर्व संकटे
सदा सुखाने जगावयाचे हृदयी भिजले पत्र पीयूष

पऱ्या देवता रानपाखरे किलबिल त्यांची झाडावरती
शिंपित उधळित दवबिंदूसम पानांवरले पत्र पीयूष

गुणांस वाचत सुचल्या गोष्टी जादुई वनदेवींच्या मज
त्यांस गुंफता कुसुमांभवती बनले गजरे पत्र पीयूष

चल जाऊरे मोक्ष मंदिरी दर्शन आत्म्याचे घेण्याला
दर्शन घेता निज आत्म्याचे झरझर झरले पत्र पीयूष
मात्रावृत्त – ३२ मात्रा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.