पिकली कोडी – PIKALEE KODEE


कधी न घेते फोडुन डोके गुगली कोडी सोडविण्या
त्यापेक्षा मी गझलच लिहिते असली कोडी सोडविण्या

पटकन मजला हे कळतेकी जे ना अपुले धरू नये
चुकून धरले तर ना डरते धरली कोडी सोडविण्या

नक्कल करुनी कोडी रचता मिळणारे सुख ना शाश्वत
आहे वेळ म्हणून का शिणू अडली कोडी सोडविण्या

जन्मदिवस वर्षातुन अपुला फक्त एकदा खरा खरा
वार पकडता आठवड्याला नकली कोडी सोडविण्या

ऐक सुनेत्रा पहा सुनेत्रा जाण सुनेत्रा बोलाया
एक क्षण ही उरेल पुरूनी पिकली कोडी सोडविण्या
मात्रावृत्त (३० मात्रा =१६+८ +६)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.