टोणा करणी करती भोंदू व्यंतर योनी मिळावया
नर पशु पक्षी बळी देउनी पिशाच टोणी मिळावया
तृतीय पंथी हिजडे हिजड्या फिरती दारी जगण्याला
त्यांनाही दे मार्ग तपस्या शीतल लोणी मिळावया
शुचिता हृदयी वाढत जाता संयम येतो कृतीमधे
सत्य प्रकटते रत्नत्रय रत्नांची गोणी मिळावया
आर्जव मार्दव ब्रम्हचर्य अन अकिंचन्य युत धर्म क्षमा
पालन करती जीव एकटे प्रियतम कोणी मिळावया
त्यागुन भय तव मनात दडले ऐक आतला ध्वनी खरा
सोनु सुनेत्रा नावाची तुज मैत्रिण सोनी मिळावया
गझल मात्रावृत्त – मात्रा ३०