सिटी पुणे जसे तसे असेन मस्त स्मार्ट मी
सिटीत पिंपवड जसे जगेन मस्त स्मार्ट मी
सिटीत पिंपवडमधे सुजाण माणसे खरी
तयातले कवीगुणी स्मरेन मस्त स्मार्ट मी
वरून पिंपरी जरी जहाल खूप वाटते
तिच्यामधील मार्दवा जपेन मस्त स्मार्ट मी
सचैल चिंचवड पुरे भिजून चिंब पावसी
तसेच पावसात या लिहेन मस्त स्मार्ट मी
जलात नाच नाचती मयुर निळे निळे निळे
तसे जलात नाचण्या भजेन मस्त स्मार्ट मी
कुलीन भोसरीसवे निवांत प्राधिकरण हे
तिथे मजेत राहण्या दिसेन मस्त स्मार्ट मी
विमाननगर आठवे मला तुझे नवे सखी
क्षणात यावया तिथे उडेन मस्त स्मार्ट मी
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २४)
लगावली – लगालगालगालगा/लगालगालगालगा/