सावळा पाऊस ल्याली पुण्यनगरी
श्रावणी धारांत न्हाली पुण्यनगरी
मावळ्यांची संस्कृती इतिहास पावन
आठवोनी चिंब झाली पुण्यनगरी
लेखणीचे रक्षिण्या स्वातंत्र्य लढते
रेखुनीया तिलक भाली पुण्यनगरी
टिकवुनी बाणा मराठी इंग्रजीसम
वाघिणीचे दूध प्याली पुण्यनगरी
उगवतीच्या लालिम्याला प्राशुनीया
दिव्य शोभे वीरकाली पुण्यनगरी
गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २४)
लगावली – गालगागा/ ३ वेळा