अता मी लिहावे अता मी पुसावे
फिरूनी कुरूपा अचुक मी टिपावे
खऱ्या पावसाला असा जोर येता
पुन्हा प्रेमस्मरणी मजेने रमावे
धरा चिंब झाली झरा वाहतो हा
तयातील पाणी मनी साठवावे
निळे मेघ आता किती कृष्ण झाले
तयांसारखे मी अता मुक्त व्हावे
अशी ये समोरी मला सत्य म्हणते
कधीची उभी मी तया ते कळावे
नदी आटलेली अता ही फुसांडे
फुसांडून तूही पुन्हा धबधबावे
धुवांधार धारा मनाला शहारा
मुलींनी मुलांनी फुलावे खुलावे
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.