मूर्तीस त्या पाहून ये
नागासवे डोलून ये
ज्या घातल्या शपथा तुला
त्या सर्व तू माळून ये
जी पुस्तके मी वाटली
ती पूर्ण तू वाचून ये
अभिषेक तू केला जरी
ती नग्नता जाणून ये
जे बांधती तुज सारखे
ते हात तू बांधून ये
जे पत्र तू नाही दिले
पत्रास त्या घेऊन ये
जे रंग माझे लपविले
रंगास त्या उधळून ये
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/