हृदय प्रीतिने पूर्ण भरावे
भरभरुनी मज देता यावे
जमिनीवरती पाठ टेकण्या
एक चंदनी काष्ठ मिळावे
तुझिया नेत्रांमधे प्रियतमा
सहज सहज विरघळून जावे
मदिरेचीही तहान सरली
फक्त वाटते तुलाच प्यावे
पंख छाटुनी कषाय भरले
म्हणे ‘सुनेत्रा’ उंच उडावे
हृदय प्रीतिने पूर्ण भरावे
भरभरुनी मज देता यावे
जमिनीवरती पाठ टेकण्या
एक चंदनी काष्ठ मिळावे
तुझिया नेत्रांमधे प्रियतमा
सहज सहज विरघळून जावे
मदिरेचीही तहान सरली
फक्त वाटते तुलाच प्यावे
पंख छाटुनी कषाय भरले
म्हणे ‘सुनेत्रा’ उंच उडावे