निळे जांभळे थेम्ब बोचरे तुझे टपोरे आले
काळ्या कोऱ्या पाटीवरती अक्षरांत मी न्हाले
गडद काळिमा शांत होऊदे प्राशुन हिरवे पाणी
मुळाफुलांनी गावी आता निळसर पहाटगाणी
घूम पावशा पानांआडून येण्या पाऊसधारा
उन्हास हळदी तना लपेटून शीळ घालण्या वारा
लिहीन गाणी सहज सहज मी नाव सुनेत्रा माझे
कळ्याफुलांचे गेंद तरुंवर दलात सौरभ ताजे
सुगंध लुटण्या येतील भुंगे कृष्ण घनांसम वेडे
देईन त्यांना खाण्यासाठी गोड गोड मऊ पेढे