जाणिवेने नेणिवेचे हात हाती घेतले रे
इंद्रधनुचे पंख झुलते सात हाती घेतले रे
रंग ता ना पि हि नि पा जा बुडविताना सागराने
भावना उधळून घन उत्पात हाती घेतले रे
लोभ टाळुन पारध्याने शर गझाला झेलल्यावर
नयन बाणांचे कुरंगी घात हाती घेतले रे
चंचलेने उधळल्यावर अक्षरी धन मेघनेतुन
ओंजळी भरभरुन ते मी गात हाती घेतले रे
पेलुनी मम कलम शिसवी यक्षिणी हातात घेता
गजमुखातिल शुभ्र कोणी दात हाती घेतले रे
गालगागा चारवेळा लिहित गेले मी ‘सुनेत्रा’
शेर साही प्रसविता प्रतिघात हाती घेतले रे