मारू नको फुलाला म्हणते कळी मुक्याने
तोडून काचणारी पर साखळी नव्याने
तू ओरडून तेव्हा केला किती तमाशा
आता कशास देशी प्राणी बळी मुक्याने
वाढून भरभरूनी रसदार लाल भाजी
चमच्यांस पाक गोष्टी सांगे पळी मुक्याने
फुकटात पाजणारे मधल्यांस डोस येता
प्राशून डोस पिचली मधली फळी मुक्याने
पाण्यात पोहुनीया येता वरी सुनेत्रा
जाऊन गाळमाती बसली तळी मुक्याने