फुलवाली का मूक जाहली बुके बांधुनी
झाडांवरचे गुलाब मौनी मुके बांधुनी
दाट धुक्यातिल दिसतिल वाटा सूर्य उगवता
कसे ठेवशिल निळे पारवे धुके बांधुनी
पूल बांधण्या नदीवरी तू पसर ओंडके
नकोस ठेवू ओले ते वा सुके बांधुनी
नाजुक माझ्या हृदयामध्ये गझलेमध्ये
खरेच का मी मुला फुलांना चुके बांधुनी
अंबरातल्या अन भूवरल्या साऱ्या चंचल
नक्षत्रांना मी तारा लुकलुके बांधुनी
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)