रत्नात रत्न सुंदर बाईपणाच माझा
सांगे लिहावयाला आईपणाच माझा
संस्कार वर्ग माझा शिकण्यास रीतिभाती
जपतो मुलाफुलांना दाईपणाच माझा
ती मूढता तयांची वेगास खीळ घाली
नडणार कोडग्यांना घाईपणाच माझा
मम लेखणीत शिरुनी या वासरीवरीरे
मांडेल भावनांना शाईपणाच माझा
नसते कुटील कपटी माया खऱ्या गुरुंची
मायेस साक्ष त्यांच्या माईपणाच माझा
जेथे नको तिथेही हे मारतात शेरे
लावेल शिस्त यांना ताईपणाच माझा
तेलास तापवूनी घेऊनिया परीक्षा
जमवेल फोडणीला राईपणाच माझा
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा.
One response to “बाईपणा – BAAEEPANAA”
Good One !