मुक्तक लिहुकी गझल रुबाई
म्हणू पाळणा की अंगाई
नाव फुला तुज कुठले देऊ
गुलबक्षी की चंपक जाई
आतुन आतुन उचंबळे कढ
अश्रू टिपण्या नकोच घाई
पणती ठेऊ तुळशीपाशी
परतुन येता गुरे नि गाई
गोरज समयी धूळ रंगते
सूर्यास्ताची ही नवलाई
मनात काहूर हृदयी हुरहुर
आठवती दादा अन आई
खट्याळ वारा पदर उडवितो
शीळ घालुनी बाई बाई