हित मित प्रिय “मी” बोले माझा
ऐकत आत्मा डोले माझा
दांडू घेउन परमेष्ठींचा
अचल विटी “मी” कोले माझा
गर्भगृहातिल गर्भ पाहण्या
अहमपणा “मी” सोले माझा
नवरात्रीच्या रंगांमध्ये
कायेला “मी” घोले माझा
हाती पकडुन तुला फळांना
बागवान “मी” तोले माझा
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)