तो गुन्हा माझाच होता मी मजेने बोलले
ते जरा होतेच वेडे मैत्र त्यांनी टाळले
काय मी बोलून गेले वय जरी नादान ना
बोलणे बेछूट त्यांचे लाखदा मज बोचले
आजही करतेच जखमी ना स्वभावाला दवा
कर्मफळ मिळतेच त्याचे पुरवितेना चोचले
मज जरी माहीत होते मी कुठे नव्हते उणी
प्रीतिच्या गाभ्यात शिरण्या मी तपाने वाळले
भयफुला तू उमल आता भय तुझे संपावया
वक्र कपटी व्यंतरांना वासनांनी जाळले
गझल – अक्षरगणवृत्त(मात्रा २६)
लगावली – गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा/