जादुई शब्दात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
जादुई काव्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
जे हवे ते मिळविण्या मी कोष विणते दिव्या ऐसा
जादुई कोषात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
नेणिवेतिल स्वप्न अंबर ओतते राशी धनाच्या
जादुई स्वप्नात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
देह माझा एक चुंबक खेचुनी घेई सुखांना
जादुई आत्म्यात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
मी “सुनेत्रा” जाणतेकी ही धरा मैत्रीण माझी
जादुई नेत्रात माझ्या झळकते ब्रह्मांड अवघे
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २८)