समुद्रातले खारे पाणी
मृगजळ लहरी फसवे पाणी
दुःख मनीचे भरता नयनी
गालावर कर्मांचे पाणी
कृष्ण घनांना भरते येता
जल आनंदाश्रूंचे पाणी
तहानलेल्या मृगास फिरवी
भ्रम दृष्टीचे कोरे पाणी
लीड घ्यावया शिसे पचविते
मम इच्छाशक्तीचे पाणी
समुद्रातले खारे पाणी
मृगजळ लहरी फसवे पाणी
दुःख मनीचे भरता नयनी
गालावर कर्मांचे पाणी
कृष्ण घनांना भरते येता
जल आनंदाश्रूंचे पाणी
तहानलेल्या मृगास फिरवी
भ्रम दृष्टीचे कोरे पाणी
लीड घ्यावया शिसे पचविते
मम इच्छाशक्तीचे पाणी