भाव खात राहिले
ते सुमार बोलले
कर कबूल हा गुन्हा
नागिणीस छेडले
मी कधीच रे तुझे
पाय नाय चाटले
कपट माझियापुढे
कोणते न चालले
लहर मी असूनही
वादळास चोपले
शस्त्र अस्त्र टाकुनी
ते भिकार पांगले
वॄत्त – सुकामिनी (अक्षरगणवॄत्त)
लगावलीः गालगाल गालगा
मात्राः २१२१ २१२ = ११