अखेर मी गाठलेच त्यांना
अखेर मी कोंडलेच त्यांना
वरून अक्षत जरी वाटती
अखेर मी चाळलेच त्यांना
किती खडे पांढरे काढुनी
अखेर मी ठेचलेच त्यांना
ठेचुन चेचुन भुगा करोनी
अखेर मी पेरलेच त्यांना
सुगंध मातीतला उधळण्या
अखेर मी वाटलेच त्यांना
मात्रावृत्त(१६मात्रा)