व्यक्त व्हावयास हाच मधुर मधुर मस्त काळ
नयन वाचण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
तू गुलाब मी शबाब तू नवाब मी शराब
प्रीत प्राशण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
लोचनात बिंब पाहताच भ्रमर का अधीर
अधर चुंबण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
पुस्तकात मैफिलीत चांदण्यात नाचतेच
गझल ऐकण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
भांडणे पुरे अता हवीच एक खास बात
साद ऐकण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
दोन हात पुष्परूप चार तेच व्हावयास
बंध बांधण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
बासरीस वाजवीत गोधुलीत रंगण्यास
मोद वाटण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ
वृत्त – चंचला, मात्र २४
लगावली – गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/ गा ल गा ल/