जरी भासते बंद बंद मी
केवळ आहे मुक्तछंद मी
प्रेमाने घन जमून येते
पेढा बर्फी कलाकंद मी
नकोस बांधू सलेल तुजला
नाजुक हलका बंध फंद मी
पुन्हा नव्याने वाच पुस्तके
देइन दृष्टी स्वच्छ मंद मी
हिरवी मिरची पिकले जांभुळ
सासू नाही मधु नणंद मी
जरी भासते बंद बंद मी
केवळ आहे मुक्तछंद मी
प्रेमाने घन जमून येते
पेढा बर्फी कलाकंद मी
नकोस बांधू सलेल तुजला
नाजुक हलका बंध फंद मी
पुन्हा नव्याने वाच पुस्तके
देइन दृष्टी स्वच्छ मंद मी
हिरवी मिरची पिकले जांभुळ
सासू नाही मधु नणंद मी