निघे सासुराला जरी मेघमाला
नको नीर सांडू म्हणे पावसाला
न्यहाळू कशाला घनांची निळाई
धरेवर निळी नाचता मयुरबाला
सई ये प्रभाती फुले वेच सारी
करू गूजगोष्टी बसोनी उन्हाला
बरस पारिजाता नवी मांड चित्रे
जसे चंद्र तारे घरा-अंगणाला
झरा बागडे हा पुन्हा परसदारी
मला सांगतो ये बसू वारियाला
नभी पाखरांचे थवे गात झुलता
मधुर गीत गाण्या गळा मुक्त झाला
सुनेत्रांस माझ्या सुनेत्राच सांगे
खरी साद देना तुझ्या अंबराला
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.