खुल्या मनाने रहा सुखाने मिळेल ते ते! तुझेच आहे!!
जपेल जो रे घरकुल मंदिर गृहस्थ तो रे! खरेच आहे!!
हिरण्यकेशी जलौघवेगा! अशीच नावे तशीच ती का?
असा न कोणी सवाल पुसतो कुणी कुणाला बरेच आहे!!
हितास जप तू स्वतःच अपुल्या कुणी न दुसरा जपेल त्याला;
असेल ज्याचा प्रपंच सुंदर! तयास मुक्ती इथेच आहे!!
अधर्म कुठला? स्वधर्म शक्ती! मधुरा भक्ती! तुला कळावी;
ऋषी मुनींची शिकवण साधी! निसर्ग ईश्वर! खरेच आहे!!
सरस्वतीच्या कृपाप्रसादे लिहेन काही अजून थोडे!
स्वहित जपाया परहित करते! तयात माझे भलेच आहे!!
नको सुनेत्रा झरूस आता तुझ्या तनूतिल विजेस जपण्या
मराठमोळे मन मरगठ्ठे सदैव तुझिया सवेच आहे
वृत्त – हिरण्यकेशी, मात्रा ३२
लगावली – ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/