पाऊस माझा मित्र हा
वर्षाव माझा मित्र हा
अस्तास जाता सूर्य तो
काळोख माझा मित्र हा
दगडास पाझर फोडतो
भूकंप माझा मित्र हा
चष्मा सदा बदले जरी
ऋतुरंग माझा मित्र हा
मतदान करण्या येतसे
माणूस माझा मित्र हा
प्राण्यावरी प्रीती करे
प्राणीच माझा मित्र हा
हे वृत्त संयुत शालिनी
शालीन माझा मित्र हा
वृत्त – संयुत, मात्रा १४
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/