माय चंदनी – MAAY CHANDANEE


आभाळातिल सजल घनांची भाऊबीज
ओवाळी जलदांस अंबरी ताई वीज

धारारूपी गझलेचे उलगडण्या राज
वाटिकेत फुलवून पिसारा मयुरा भीज

जरी रिक्त जाहलेत बरसुन अक्षर मेघ
भरुन पावती पण त्यागाचे होता चीज

इंच इंच लढवाया डोंगर काव्यगंगे
माय चंदनी खोड होउनी सोसू झीज

स्वातंत्र्यातिल झोप सुखे घेण्यास भावा
झऱ्याकाठच्या सारवलेल्या कुटीत नीज

गझल मात्रावृत्त (२३ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.