झाला मनमोर मम घन चैतन्य विभोर
वर्षण्यास चांदण्यात नभ आतुर आतूर
माझे रंगरूप बाई बाई मला वेड लावी
मासा तळ्यातील हाती अलगद आला बाई
नीर तळ्यातील शांत प्रतिबिंब स्थीर त्यात
योग्यासम ध्यानस्थ तो काठावरी उभा निंब
अंगणात कवडसे उतरले नाचावया
पाठशिवणीचा खेळ खेळताती पर्णछाया
पहाटेस शीत वारा सडा फुलांचा शिंपेल
चाफा बूच पारिजात चिंब दवात न्हाईल