आठवतेका मिठी घट्ट ती कडकडुनी जी तुला मारली
आठवतेका प्रिया तुझी तुज प्रीतीने तू जिला मारली
प्रियतम तू अन मीच प्रियतमा चुम्बाया तुज आसुसलेली
चुंबुन माझे अधर मिठी तू माझ्यातिल मृदु फुला मारली
बरेच झाले तुझ्या मिठीने सरळ मनाला जपावयाला
भोगासाठी हपापलेली कारस्थानी कला मारली
प्रयोग माझे सत्याचे हे खऱ्या अहिंसक जीवांसाठी
सत्याच्या तलवारीने मी ढोंगी अबला बला मारली
मम नजरेची कट्यार बर्ची तिची साधना अविरत केली
मूढ वाकुड्या अहंपणावर सुरी फेकुनी तिला मारली
मात्रावृत्त – मात्रा ३२