मीच ती बासरी – MEECH TEE BAASAREE


मीच ती बासरी तुझ्या अधरी
सुंदरा नाचरी तुझ्या अधरी

चालते धावते कधी झुलते
रंगलेली परी तुझ्या अधरी

चंचला चांदणे जरी उधळे
होतसे बावरी तुझ्या अधरी

चिंब तव डुंबुनी निळ्या नयनी
राधिका लाजरी तुझ्या अधरी

मौन ती दामिनी शिळा बनली
जाहली वैखरी तुझ्या अधरी

बघ हळू उमलली गुलाब कळी
लोळते साखरी तुझ्या अधरी

अक्षरगणवृत्त – गालगा/गालगा/लगाललगा/(मात्रा – १७)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.