मी इळभर लिवले शिवले – MEE ILABHAR LIVALE SHIVALE


मी इळभर लिवले शिवले पर कागुद चिंधी झाला
ती उनाड मैना कावुन शबुदाचा करती काला

त्यो पान खाउनी थुकला मी हुशार हाये म्हणला
मंग मीबी बोल्ले लिवरं त्यो चघळत बसला पाला

म्या कायबाय गिरगटलय त्ये चिडलं तरिबी हासतय
खट दाजी सरकिट येडा अन खासा दिसतुय साला

गझलच्या जिमीनीमंदी मिरचीचा वाफा सजला
ये तोडू लवंगि मिरची त्यो इवाय घालल घाला

औंदाच्या सालीसुद्दा म्यां कोबी फुलवर केला
कट फक्कड मटार भुर्जी खायाला गुर्जी आला

हे इंजन कुक कुक वाजे पाटातुन व्हातय पानी
ढबु शिमला मिरची सुकली तिजलाबी पानी घाला

वावरी राबतो कसतो बाजारी सौता इकतो
घरधनीन चिकनी सुंद्रा लय भाव तिच्या मालाला

समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.