अहह ! अहह ! आषाढ घनांतुन
कृष्ण नीळ तन मन जलदांतुन
शकुन्तलेचे कुंतल श्यामल
बरस बरसती झरझर भूवर
कुरळ कुरळ कचभार प्रियेचा
उडवत जाता झोत हवेचा
कालिंदीच्या सलील जलावर
हिंदकळे राधेची घागर
पाझरणाऱ्या त्या सलिलावर
मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….
अहह ! अहह ! आषाढ घनांतुन
कृष्ण नीळ तन मन जलदांतुन
शकुन्तलेचे कुंतल श्यामल
बरस बरसती झरझर भूवर
कुरळ कुरळ कचभार प्रियेचा
उडवत जाता झोत हवेचा
कालिंदीच्या सलील जलावर
हिंदकळे राधेची घागर
पाझरणाऱ्या त्या सलिलावर
मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….