मुस्कट दाबिन – MUSKAT DAABIN


पाताळातुन तुजला शोधिन नाव सुनेत्रा लावे मी
प्रकाशवेगा मागे टाकिन नाव सुनेत्रा लावे मी

जरी नाटके करून सोंगे येशिल माझ्या पुढ्यात तू
तुझे मुखवटे उखडुन फेकिन नाव सुनेत्रा लावे मी

कलशावरती करुन मुलामा म्हणे जरी तो चंद्र पहा
प्रकाशासही काळे फासिन नाव सुनेत्रा लावे मी

मणामणाचे जरी घुंगरू दिलेस मज तू बांधाया
तुडवुन तुजला गाईन नाचिन नाव सुनेत्रा लावे मी

ही न सुनेत्रा ही तर वेश्या मला तोतया वाटे ती
म्हणणाऱ्याचे मुस्कट दाबिन नाव सुनेत्रा लावे मी

मात्रावृत्त(८+८+८+६=३०मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.