दाटून मेघ आले वाटे मला लिहावे
वळिवात चिंब झाले वाटे मला लिहावे
क्षितिजावरी ढगांचे उतरून यान येता
ढग बरसण्या निघाले वाटे मला लिहावे
आसूड तो विजेचा वाजे ढगात काळ्या
धारांत भय बुडाले वाटे मला लिहावे
जणु मोगरा नभीचा तैश्या टपोर गारा
झेलीत त्यांस न्हाले वाटे मला लिहावे
जैश्या सचैल वेली तैशीच काव्यपुष्पे
मी काव्यगंध प्याले वाटे मला लिहावे
गझल अक्षरगण वृत्त मात्रा २४(आनंदकंद)
लगावली – गागालगा/लगागा/गागालगा/लगागा/