घरास माझ्या खिडक्या दारे
आत वाहते वसंत वारे
प्रभात समयी पक्ष्यांसंगे
मन म्हणते मज गा रे गा रे
बागेमधली फुले पाहुनी
काव्य बरसते दरवळणारे
अन्न शिजविते रसोईत मी
शुद्ध चवीचे आवडणारे
अंगणात गप्पांची मैफल
सोबतीस मम प्रियजन सारे
जिवलग प्रेमाचे शेजारी
जणू हासरे भवती तारे
घरात तुजला नाही थारा
जा दुःखा तू जा रे जा रे
गझल – मात्रावृत्त (मात्रा १६)